माणचा शिलेदार कोण? फैसला होणार आज

Maharashtra Assembly Polls | मताचा वाढता टक्का कोणाला देणार धक्का? निकालातून होणार चित्र स्पष्ट
Maharashtra Assembly Polls |
आ. जयकुमार गोरे, प्रभाकर घार्गे File Photo
Published on: 
Updated on: 

दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी ऐन थंडीत चांगलीच तापली. या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. निवडणूक रिंगणात उतरलेले भारतीय जनता पार्टीचे आ. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यात हाय व्होल्टेज मुकाबला झाला असून मतदार संघात चुरशीने 71 टक्के मतदान झाले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 10 टक्क्यांनी मतदान वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज होत असलेल्या मतमोजणीत माणचा शिलेदार कोण, हे स्पष्ट होणार आहे.

माण विधानसभा मतदारसंघात आ. जयकुमार गोरे व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यासह प्रसाद मल्हारराव ओंबास, अरविंद बापू पिसे, अर्जूनराव उत्तम भालेराव, इम्तियाज जाफर नदाफ, दादासाहेब गणपत दोरगे, सनीदेव प्रभाकर खरात, इंजि. सत्यवान विजय ओंबासे, अजित दिनकर नलवडे, अजिनाथ लक्ष्मण केवटे, अमर शंकरराव घार्गे, जयदीप पांडुरंग भोसले, जितेंद्र गुलाब अवघडे, नानासो हरी यादव, नारायण तातोबा काळेल, प्रभाकर किसन देशमुख, बजरंग रामचंद्र पवार, बाळराजे रेवण वीरकर, सोहम ऊर्फ सोमनाथ लक्ष्मण शिर्के व संदीप जनार्दन खरात यांनीदेखील ऐन थंडीत चांगलेच राजकीय वातावरण तापवले.

प्रचार काळात स्वत: जयकुमार गोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत विरोधकांवर तोफ डागली, तर प्रभाकर घार्गे यांच्यासाठी खा. शरद पवार, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांच्यासह दिग्गजांच्या सभा झाल्या. त्यानंतर मतदारांनीही तितक्याच चुरशीने मतदान करून मतदानाचा टक्का वाढवला आहे. हा वाढलेला मतांचा टक्का कोणाला धक्का देणार, हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news