वर्धा: नितेश कराळे मास्तरांना बेदम मारहाण

Nitesh Karale | Maharashtra Assembly Polls | भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप
Nitesh Karale attack
उमरी मेघे येथे नितेश कराळे मास्तरांना बेदम मारहाण करण्यात आली. File Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना बेदम मारहाण करण्यात आली. उमरी मेघे येथे मतदान केल्यानंतर कराळे मास्तर आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर येत होते. यावेळी हा प्रकार आज (दि.२०) दुपारी घडला. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे.

कराळे मास्तर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून मारहाण करणारा हा आमदार पंकज भोयर यांचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. गुंडाराज सुरू असल्याचा दावा कराळे मास्तर यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news