मतदान झाले, आता विजयाचे आडाखे; कार्यकर्ते गणिते मांडण्यात व्यस्त

Maharashtra Assembly Polls | Parbhani Elections | गंगाखेडमध्ये ७३.०४ टक्के मतदान
Parbhani Assembly Polls
परभणी मतदान झाल्यानंतर आता विजयाचे आडाखे बांधले जात असून कार्यकर्ते गणिते मांडण्यात व्यस्त आहेत. File photo
Published on: 
Updated on: 
आनंद ढोणे

पूर्णा: गंगाखेड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) पूर्णा शहरासह तालुक्यातील १४९ बुथवर मतदान झाले. ७३.०४ टक्के मतदानाची टक्केवारी नोंद झाली. पूर्णेचे शेतकरी भुमिपुत्र तथा शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम, रासपाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, तर वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांच्यात अटीतटीची लढत झाली.

निवडणूक प्रचार काळात एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. यातच कार्यकर्त्यांचे जथ्थे या पक्षातून त्या पक्षात, तर या मित्रमंडळातून त्या मित्रमंडाळात प्रवेशीत झाले. तसेच पाठिंबा सत्रही गाजले. त्याचबरोबर निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊनही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले. परंतु , निवडणूक आयोगाने नेमून दिलेले भरारी पथके जाणीवपूर्वक याकडे कोणाडोळा करताना दिसून आले.

या उलट पोलीस प्रशासनाने मात्र पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, ताडकळस पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, चुडावा ठाण्याचे नरसिंग पोमनाळकर यांनी विशेष पोलीस दलासह निवडणूक प्रचार काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मतदानानंतर आता कोण निवडून येणार? कोणत्या उमेदवाराला कुठे कसे मतदान झाले? कोण किती मते खाणार? मग अमुक इतक्या मतांची आघाडी घेऊन आपलाच उमेदवार विजयी होणारच? असे विजयाचे आडाखे, गणिते मांडताना कार्यकर्ते मग्न असल्याचे दिसून येत आहे. शेवटी कोण निवडून येणार? हे पाहण्यासाठी शनिवारी (दि.२३) मतमोजणीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Parbhani Assembly Polls
परभणी : मानवतला अवैध दारुसह ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या