जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये २० तारखेला बंद झालेले आहे. २३ तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक समर्थक आपल्या आमदाराचा विजय झाला, असे बॅनर लावत आहेत. तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करीत आहेत.
२३ तारखेला दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील अकरा आमदारांचे भवितव्य कळणार आहे. तेच आमदार राहणार की कुठे चेहरे बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.