

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी मूळ भाजपचे मात्र शिंदे गटातून शिवसेनेची उमेदवारी केलेल्या नवख्या अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला.
या धक्कादायक निकालावर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे, राज्यातील निकाल हे धक्कादायक आहेत. या निकालामुळे जन सामान्य जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. धर्माचा आणि पैशांचा उपयोग केला गेला. लाडकी बहीण सारख्या योजना फक्त राजकारणासाठी वापरल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले.
महायुतीला मिळलेल्या जागा हे त्यांचे यश नाही , ओढून ताढुन युकत्या करून महायुतीने यश मिळवले आहे. ज्या साधनांचा वापर भाजप करतय यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार आहे. वेगळा दर्जा भाजपने निर्माण केला आहे, पुढील काळात लोकशाही कुठे जाईल, याची काळजी वाटणारी ही निवडणूक असल्याचही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.