Thane | पैशांची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वेस्थानकावर पथके तैनात

Maharashtra State Excise : अवैध मद्यावर ड्रोनद्वारे करडी नजर
राज्य उत्पादन विभाग
राज्य उत्पादन विभागpudhari file photo
Published on
Updated on

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा, देसाई, मनेरा, अंजूर, आलमगड या ठिकाणी होणार्‍या अवैध दारु विक्रीबाबत कडक कारवाई करा, नियंत्रण ठेवण्यासाठी पथक व ड्रोनद्वारे माहिती घेवून परराज्यातून येणारी दारु वाहतूकीसाठी चेक पोस्ट तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी राज्य उत्पादन विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Summary

निवडणुकीत उमेदवारांकडून भरमसाठ पैसा खर्च केला जात असल्याने पैशाची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला प्रत्येक स्टेशनवर पथक नियुक्त करण्यात येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीकरिता आज ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीत मद्याबाबत कडक निर्देश देताना 10 लाख रुपयांच्या वरती रोख रक्कम सापडल्यास ती तात्काळ आयकर विभागाकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या. बँका, पतसंस्था, सहकारी संस्था यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात. संबंधित अधिकार्‍यांनी नियंत्रण ठेवावे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम सापडल्यास ती कोषागार किंवा उपकोषागारात जमा करावी. याचे सर्व अहवाल निवडणूक विभागाला सादर करावे लागतात. जीएसटी विभागाने गोदाम, पेट्रोलपंपावर होणार्‍या लक्ष ठेवावे. रेल्वेद्वारे होणार्‍या पैशाची वाहतूक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्टेशनवर पथके नेमावीत, अशा सूचना देण्यात आल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार सर्व कार्यालय स्थापन केल्याबाबत विचारणा केली. त्यांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. निवडणूक विषयक दैनंदिन अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या. कायदा व सुव्यस्था अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे. कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. सिंगल विंडोबाबत सर्व परवानग्या एकत्र भेटतील याकडे लक्ष द्यावे. निवडणूक विषयक येणार्‍या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. पोस्टल मतदानाबाबत संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करुन त्याची माहिती जमा करावी. प्रशिक्षणाचे योग्य नियोजन करावे, मतदान केंद्र तयार करताना त्या ठिकाणी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news