ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 28 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज

रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
CM Ekanath Shinde, Kolhapur
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
Published on
Updated on

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई (आठवले) महायुतीने सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मविआ आघाडीला अद्याप तुल्यबळ उमेदवारच सापडलेला नाही. मात्र, चौथ्यांदा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात महायुतीकडून लढणारे एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे घटकपक्ष उपस्थित राहणार आहेत.

2004 मध्ये ठाणे विधानसभेतून शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली विभाजन होऊन निर्माण झालेल्या कोपरी-पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. किंबहूना या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, नगरविकासमंत्री आणि आता सर्वोच्च मुख्यमंत्रिपदापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मजल मारली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news