

कल्याण : डोंबिवली विधान सभा मतदार संघातील मतदारांनी बुधवार (दि.20) रोजी सकाळ पासूनच उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होऊन मतदारांच्या लांबचलांब रांगा लागल्या. सकाळी सात ते नऊ या पहिल्या सत्रातील टप्प्यात 8.76 टक्के झाले आहे.
मतदान प्रक्रियेतील सकाळी नऊ ते अकरा या दोन तासाच्या कालावधीत मतदान टक्केवारी वाढली असून 11.53 मतांची वाढ होऊन सात ते अकरा या चार तासांमध्ये 20.29 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे गेल्या डोंबिवली विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 40.58 टक्के मतदान झाले होते. ते यंदाच्या मतदानाच्या जवळ पास 50 टक्के मतदान झाले असून यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येत आहे. उर्वरित सात तासातील होणारे मतदान 50 टक्क्या हुन अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डोंबिवली विधान सभा मतदार संघात एकूण 3 लाख 13 हजार 122 मतदार असल्याने आता पर्यंत 69 हजार 794 मतदान झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात सकाळी 11.00 वाजेपर्यंतची एकूण मतदान टक्केवारी 16.63 टक्के झाली आहे. तर मिरा-भाईंदर सकाळी 11 पर्यंत 18.02 टक्के मतदान झाले आहे.