

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास काही दिवस शिल्लक आहेत. या काळात ठाणे जिल्ह्यात दारूची तस्करी वाढली आहे. या काळात 49 हजार लिटर गावठी दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे.
पोलिसांनी अवैध दारू निर्मिती करणार्या हातभट्टी विरोधात कारवाई सुरू केली असून ठाणे पोलिसांनी खाडी किनार्यावरील 18 हातभट्टी दारू निर्मिती करणार्या ठिकाणांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 49 हजार 788 लीटर दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन व दारू नष्ट केली आहे. तसेच 5 हजार 352 लीटर दारूसाठा जप्त केला आहे. परप्रांतातून येणार्या या दारूसाठ्याविरोधात पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत देशी आणि विविध ब्रँडची 5 हजार 352 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. त्यात ठाणे पोलिसांनी 18 हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड टाकून 49 हजार 788 लिटर दारूचा साठा विविध ठिकाणाहून जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
पोलिसांनी नष्ट केलेल्या दारू साठ्याची एकूण किंमत 25 लाख 30 हजार इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दारू विक्री व तस्करी प्रकरणी 131 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.