नांदगांव : नांदगावला भयमुक्त करण्याची भाषा करणाऱ्याना अधिच नाशिकच्या जनतेने नाकारलेले आहे. नाशिकमध्ये कोणाची किती दहशत होती हे जनता जानते. भुजबळांची दहशत मीच घालवली हे विसरले का? असा प्रतिवार करत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. मनमाड येथे माजी खा. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नांदगाव भयमुक्तीसाठी आपण उमेदवारी करत असल्याचे म्हटले होते.
कांदे म्हणाले, २ हजार ५०० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ काका-पुतणे कित्येक दिवस तुरुंगात होते. समीर हे आयुष्यभर जेलमध्ये असायला हवे होते, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच नांदगाव मतदारसंघात युतीधर्म पाळला जात नसल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा कात मला देखील येवल्यातून उमेदवारीची परवानगी द्या अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. जर पक्षाने परवानगी दिली तर छगन भुजबळ यांच्याविरोधात येवल्यातूनही निवडणूक लढवून जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.