
सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांनी विश्रामबाग, वारणाली परिसर आणि विजयनगर या भागाचा गेल्या दहा वर्षात खरा विकास केला आहे. सांगलीचा आणखी विकास होण्यासाठी आमदार गाडगीळ यांच्या पाठीशीच राहणार आहोत, अशी ग्वाही विश्रामबाग परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिली. विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर ज्येष्ठ नागरिकांची तसेच खेळाडूंची आमदार सुधीर गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यावेळी सर्वांनी पुढील पाच वर्षे सांगलीचा गतिमान विकास करण्यासाठी गाडगीळ यांनाच पुन्हा विजयी करू, अशी ग्वाही दिली.
आमदार गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात या भागाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अनेक विकासकामे केली. नागरी सुविधांचे प्रश्न अतिशय समर्थपणे सोडवण्याचे प्रयत्न केले. वारणाली येथील उड्डाण पूल गाडगीळ यांच्यामुळे पूर्ण झाला. सह्याद्रीनगरकडे जाणारा पूलही पूर्ण झाला. अनेक भागात पूर्वी रस्तेच नव्हते, ते गाडगीळ यांच्यामुळे झाले. यावेळी आमदार गाडगीळ यांनी नागरिकांचे आभार मानले.
ते म्हणाले, महायुती आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक यांचे सतत सहकार्य मिळाल्यामुळेच मी या भागाचा विकास करू शकलो. यापुढेही आपल्याला एक निश्चित आराखडा तयार करून संपूर्ण सांगली शहराचा विकास करायचा आहे. त्यादृष्टीने सर्वांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे.माजी नगरसेविका सविता मदने यांनी सुधीर गाडगीळ यांचे स्वागत केले. भाजप नेते विजय साळुंखे, सागर बिजरगी, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, कृष्णा कडणे, शिवम चव्हाण उपस्थित होते.