सिन्नर : सिन्नर मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 63.85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. यंदा मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढलेला दिसला. त्यात पुरुष 1 लाख 08 हजार 134, महिला 98 हजार 398 असे एकूण 2 लाख 06 हजार 532 मतदारांचा समावेश होता.
गेल्या काही दिवसांपासून प्रचार, सभा, गाठीभेटींनी राजकीय वातावरण तापलेले होते. मंगळवारी (दि.18) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या तसा वातावरणातही गारवा निर्माण झाला. बुधवार (दि.20) सकाळी 7 ते 9 या दोन तासांत 8.09 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. 11 पर्यंत 21.20 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार अॅड.माणिकराव कोकाटे यांनी सोमठाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डुबेरेवाडी : 102 वर्षाच्या ठकूबाई सदगीर या वयोवृद्ध महिलेने सिन्नर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.
उमेदवार उदय सांगळे यांनी चिंचोली येथील मतदान केंद्रावर, तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाटवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या संकल्पनेतून विविध ग्रामपंचायतींनी अपंगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था मतदान केंद्राच्या परिसरात केली होती. तत्पूर्वी बीएलओंमार्फत 100 टक्के दिव्यांग मतदारांची मतदान यादीत नोंद करण्यात आली होती. तसेच 100 टक्के नोंदणीकृत दिव्यांग मतदारांची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यकतेनुसार सुविधांची माहिती गोळा करून पंचायत समितीकडे पाठविण्यात आली होती. त्यामुळे दिव्यांगांचे मतदान करून घेताना फारशा अडचणी आल्या नाहीत.