

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - सध्या जे राजकारण सुरू आहे ते आजवर कधीच बघितले नाही. खोके, गद्दारी बेईमानी सुरु आहे. माझा शिवसेना पक्ष हा कधीही काँग्रेसशी युती करणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यांनतर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत कशी हातमिळवणी केली ? सत्तेसासाठी तुम्ही तिथे गेले का? असा प्रश्न महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला. लोकांना आता परिवर्तन हवे आहे.
स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दशरथ पाटील (Dashrath Patil) यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा शनिवार (दि.9) रोजी सातपूर येथे पार पडली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडी महायुतीवर निशाणा साधला.
जातीय विषमता मोठी मंडळी निर्माण करत आहेत. शिवाजी महाराज यांनी केवळ 12 बलुतेदार यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले. आरक्षण देण्याचे मार्ग आहेत त्यावरही बोलता येईल फक्त ओबीसींवर बोलणे योग्य नाही. फक्त एक समाज आणि धर्मावर बोलणे योग्य नाही. कोणत्याही पक्षाचे उमेदवारी असुदे एका विशिष्ट जात आणि समाजासाठी बोलणे योग्य नाही. सगळ्या ओबीसींना एकसंध ठेवायला हवे. वातावरण गढूळ होऊन जातीय विषमता निर्माण केली जात आहे. असे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.