पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात पुढील सरकार कोणाचे येणार?, मुख्यमंत्री कोण होणार?, आपल्या मतदारसंघातील भावी आमदार कोण? या चर्चा गल्लीबोळात आणि घरोघरी सुरू आहेत. अर्थात या प्रश्नांची उत्तरं सर्वांत अचूक तुम्हीच देऊ शकता. म्हणून दैनिक पुढारी घेऊन येत आहे 'विधानसभा अचूक अंदाज स्पर्धा.'
दैनिक पुढारी 'विधानसभा अचूक अंदाज स्पर्धा' ही स्पर्धा एकदम सोपी आहे. १० नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दैनिक पुढारीमध्ये दररोज एका प्रश्नाचे कूपन प्रसिद्ध होईल. याची अचूक उत्तरे लिहून ही १० कूपन दैनिक पुढारी देत असलेल्या तक्त्यामध्ये चिकटवायचे. हा तक्ता पुढारीच्या नजीकच्या कार्यालयात जमा करा. हे तक्ता तुम्ही २२ नोव्हेंबरपूर्वी पोस्टानेही जमा करू शकता.
बक्षिसं - स्पोर्टस गिअर सायकल, महालक्ष्मी आटा चक्की, रोनिक कुलर, वॉटर प्युरिफायर, ओके साऊंड बार (जिल्हानिहाय स्वतंत्र बक्षिसं)
टीप - ही स्पर्धा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि मुंबई या जिल्ह्यांसाठी आहे.