Maharashtra Assembly Polls | सायन-कोळीवाड्यातून रवी राजा बंडाच्या पवित्र्यात

काँग्रेसचे आमदार कानडे, कोरोटे यांचा पत्ता कट
Maharashtra Assembly Polls
Maharashtra Assembly Polls File Photo
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसने आपल्या २३ उमेदवारांच्या यादीत श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगावचे आमदार सहसराम कोरोटे या दोघांचा पत्ता कट केला आहे. सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईत सायन कोळीवाडा मतदारसंघात मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ते बंडाच्या पवित्र्यात आहेत.

काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देताना काँग्रेसने मावळत्या विधानसभेतील श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगावचे आमदार सहसराम कोरोटे या दोघांना नारळ दिला आहे. श्रीरामपूरमधून हेमंत ओगले तर आमगाव येथून राजकुमार पुरम यांना संधी मिळाली आहे. मुंबईतील कांदिवली, चारकोप आणि सायन कोळीवाडा या मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने घोषित केले आहेत. शुक्रवारी नवी दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली. उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उमेदवार अंतिम झाल्यानंतर आज नवी दिल्लीतून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ४८ उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसने घोषित केलेल्या अधिकृत जागांची संख्या आता ७१ इतकी झाली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी अपात्रतेची कारवाई झाल्याने काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नीला सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आघाडीच्या जागावाटपात मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे घेतला असून येथून माजी आमदार दिलीप बनसोड यांना संधी दिली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघातून माजी मंत्री वसंतराव पुरके यांना उमेदवारी मिळाली आहे. अर्णी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिव ाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे यांना तिकीट देण्यात आले आहे. विद्यमान आमदार कैलाश गोरंट्याल यांना जालनामधून उमेदवारी मिळाली आहे.

मुंबईत कमकुवत उमेदवार ?

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईतील कांदिवलीमधून काळू बढेलिया, चारकोपमधून यशवंत जयप्रकाश सिंह आणि सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून गणेश कुमार यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. सायन कोळीवाडा येथून रवी राजा यांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांचा पत्ता कट करून युवक काँग्रेसचे गणेश कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. मुलुंड ची जागा शरद पवार गटाला सोडली असल्याने तेथे काँग्रेसचे राकेश शेट्टी बंडखोरी करणार आहेत. मुंबईत लोकसभा निवडणुकीत चांगले यश काँग्रेसला मिळाले होते. पण कमकुवत उमेदवार आणि आघाडीत जागावाटपात काँग्रेस नेत्यांचा मुत्सद्दीपणा कमी पडल्याने मुंबईत अनेक जागा ठाकरे गटाने हडप केल्या आहेत. वसई विधानसभा मतदारसंघातून विजय गोविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

ही भाजपाची विकृत मानसिकता : पटोले

मुंबई : लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दलच्या भाजप नेत्याच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हिच भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच त्यांची खरी जागा दाखवतील, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही, अशी थेट धमकी देत भाजपाचे माजी खासदार सुजय विखेंच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख त देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्यान तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news