पालघर : शिंदे सेनेने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन अज्ञातवासात गेलेले आमदार श्रीनिवास वनगा यांच्या तिसऱ्या दिवशी घरी परतले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या कवाडा गावातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. काल मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून नातेवाईकांकडे निघून गेले होते. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे नैराश्यात गेल्याने आमदार श्रीनिवास वनगा बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वासात गेले होते. घरी परतल्याने कुटुंबिययांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार श्रीनिवास वनगा यांनी षड्यंत्र रचून माझे तिकीट कापल्याचा आरोप केला. जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी कार्यकर्त्यांना भडकावल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या बंडात सहभाग असलेल्या एकाही आमदाराला डावलणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. परंतु, षड्यंत्र रचून माझं तिकीट कापण्यात आलं. आमदार म्हणून गेली पाच वर्षे मतदार संघात प्रामाणिक काम केलं. परंतु तिकीट नाकारल्या नंतर रागाच्याभरात बाहेर गेलो होतो माझ्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालं होतं. किती दिवस बाहेर राहणार? अखेर घरी येण्याचे ठरवलं आणि घरी परतलो. पद आणि आमदार नसलो तरीही जगात खूप काही करण्यासारखं आहे, पद असेल नसेल तरीही काम करत राहणार.
राजकारणात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे दिवस नाही. विधान परिषदेची उमेदवारी देणार याबाबत आशा नाही परंतु दिल्यास स्वीकारेन. या निवडणुकीत निवडणुकीत महायुतीचे काम करणार आहे. वनगा कुटुंबाने सुरुवातीला भाजप नंतर शिवसेनेत काम केले.
जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांना त्यांच्या मर्जीतील उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात कार्यकर्त्यांना भडकावले. अशा प्रकारे खोटं काम करणाऱ्यां विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीचं कारवाई करतील. शंभूराजे देसाई यांच्या सोबत झालेली चर्चा तिकीट नाकारल्या नंतर मी भावनेच्या भरात आरोप केले. दरम्यानच्या काळात शंभूराजे देसाई यांच्या सोबत बोलणं झालं. त्यांना मी शिवसेने सोबत राहीन असे आश्वासन दिलं आहे.