

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्हाला आता आमच्या न्याय हक्कांसाठी विधानसभा लढवावी लागेल, असा निर्धार करत आपण सर्वांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. सध्या उमेदवारी अर्ज घ्यावेत. २९ ऑक्टाेबर नंतर परिस्थिती पाहून अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि. २०) केले. तसेच अनुसुचित जाती व अनुसूजित जमातीसाठी आरक्षित मतदारासघांमध्ये अर्ज दाखल करु नकाृ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ( Maharashtra Assembly poll )अंतरवली सराटी येथे निवडणूकीबात काय निर्णय घ्यायचा याबाबत बैठक आयोजित केली होती.
या वेळी जरांगे-पाटील म्हणाले की, विधानसभा निवणूकीत उतरण्याची वेळ आमच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आणली आहे. आता काही मतदार संघात उमेदवार पाडायचे तर काही मतदारसंघात निवडून आणायचे जिथे उमेदवार जिंकण्याची खात्री आहे तेथेच अर्ज दाखल करावे आमच्या मागण्यांची सहमत असणार्यांनाच प्रतिज्पत्र भरुनच उमेदवारी देणार आहोत. सहमती असणाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे.असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Assembly poll|
पुढे बोलतना जरांगे पाटील म्हणाले की गावखेड्यातील ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे. शासनाने आम्हाला निवडणूक लढवण्यास भाग पाडले आहे. आता मराठे म्हणजे काय हे तुम्हाला दाखावावे लागेल अशा इशाराही त्यांनी दिला. राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही पण आमच्या हक्कासाठी हा संघर्ष सुरु आहे. निवडणूका दरवेळी येत असतात पण आपण राजकारणासाठी आपला समाज संपवायचा नाही. आपला समाज समुद्रासारखा पसरला आहे. त्याची ताकद दाखवण्याची गरज आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्याशी आपले काही देणे नाही राजकारणात मराठा समाज खूप आहे पण माझा संघर्ष हा समाजासाठी आहे.