'त्यांच्या' पाठिंब्यामुळेच महाराष्ट्र नंबर १; PM मोदींच्या भेटीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

CM Fadnavis meets PM Modi | मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पीएम मोदींची भेट
CM Fadnavis meets PM Modi
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.(Image source- @Dev_Fadnavis)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गुरुवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचे फोटो फडणवीस यांनी X ‍‍‍‍वर शेअर केले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी पीएम मोदींची घेतलेली दिल्लीत घेतलेली ही पहिलीच भेट आहे. पीएम मोदींची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘’आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तसेच मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार.’’ असे फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या १० वर्षात तुमच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे आमचे ध्येय आहे. तुम्ही माझ्यासारख्या कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांना आणखी मेहनत घेण्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान आहात, असेही फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना श्री गणेशाची मूर्ती भेट दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे, असे फडणवीस म्हणाले. दिल्ली दौऱ्यादरम्यान पक्षातील सर्वच नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. पीए मोदी आमच्यासाठी पितृतुल्य आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा, फडणवीस काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस म्हणाले की, अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त आले आहेत. माझी आणि अजित पवारांची भेट झालेली नाही. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील तो निर्णय आमचे संसदीय बोर्ड घेते. प्रत्येक विभागातून कोण मंत्री असतील? अशी नावे काढली जातील. वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील.

परभणी घटना; 'लोकांनी संविधानिक मार्ग स्वीकारायला पाहिजे'

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने विटंबना केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, ''संविधान संदर्भात माथेफिरू व्यक्तीने कृत्य केले आहे. तो मनोरुग्ण आहे. त्याला अटक झाली आहे. पण त्यावर हिंसा होणे योग्य नाही. लोकांनी संविधानिक मार्ग स्वीकारायला पाहिजे.''

CM Fadnavis meets PM Modi
‘महायुती’च्या जागा वाटपाचं सूत्र ठरलं! 'भाजपला २०, शिवसेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news