राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण पश्चिम मतदारसंघातून शंखनाद प्रचार रथावर स्वार होत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबतच दक्षिण नागपूरचे मोहन मते, पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे अशा तिघांचे अर्ज दाखल झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर आजी-माजी खासदार आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.
ओवळा माजिवडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार (दि.25) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. तर या उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. ठाकरे गटाचे उमेदवार नरेश मनेरा यांनी देखील यावेळी अर्ज दाखल केला आहे.
महायुतीमध्ये कुठेही संघर्ष, वाद नाही. सर्व काही समन्वयाने सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. प्रताप सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
संदीप जळगावकर भांडुप पश्चिम विधानसभा मतदार संघातून होते इच्छुक हाेते. शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे विभागातील अनेक कार्यकर्ते नाराज हाेते. त्यामुळे दीडशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे.
संविधान चौकातून रॅली काढत भाजपने आज नागपुरात शक्तीप्रदर्शन केले. संविधान चौक ते आकाशवाणी चौक भव्य नामांकन रॅली काढण्यात आली. देवेंद्र फडणवीस आज दक्षिण पश्चिम मतदारसंघातून शंखनाद, प्रचार रथावर स्वार होत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच दक्षिण नागपूरचे मोहन मते पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे शहरात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दक्षिण पश्चिम नागपूर येथून अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "ही माझी सहावी निवडणूक आहे. पण, गेल्या पाच निवडणुकांमध्ये जसा मला जनतेचा आशीर्वाद मिळाला, तसाच यावेळीही माझ्यावर जनतेचा आशीर्वाद असेल आणि मी चांगल्या मतफरकाने निवडून येईन."
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी तर अनुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे.
माजी खासदार संजय पाटील आणि इस्लामपूरचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.