छत्रपती संभाजीनगर : शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर एमआयएमच्या रूपानेही तिसरे तगडे आव्हान उभे आहे. मतदानाची वेळ जवळ येत आहे तसा प्रचारही जोर धरत असून तिरंगी लढत आता चांगलीच रंगतदार वळणावर आली आहे, तरी मतविभाजनावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याने हा सुवर्ण मध्य साधणार कोण? याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अनेक अपक्षही मैदानात उतरले आहे. काही ठिकाणी बंडखोरही आहेत. सर्वांकडून लहान- मोठ्या सभा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर बैठका सुरू आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने प्रचाराने वेग घेतला आहे. मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप जैस्वाल, शिवसेना ठाकरे गटाकडून बाळासाहेब थोरात, एमआयएमकडून नासेर सिद्दीकी आणि वंचित मोहमंद जावेद, मनसेचे सुहास दाशरथे, प्रहारचे डॉ. प्रमोद दुथडे, ठाकरे गटाचे बंडखोर जयवंत ओक, काँग्रेसचे काडीमोड घेतलेले हिशाम उस्मानी यांच्यासह एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत.
यात शिंदे गटाचे जैस्वाल, ठाकरे गटाचे धोरात आणि एमआयएमचे सिद्दीकी यांच्यात रंगणार आहे. तर वंचितचे जावेद यांचेही आव्हान असणार आहे. मुख्य म्हणजे शिवसे- नेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने हिंदू मांचे विभाजन होणार आहे. याचा फायदा एमआयएमला होऊ शकतो. परंतु वंचितनेही मुस्लिम उमेदवार दिल्याने एमआयएमची काहीशी कोंडी झाली आहे. त्यांच्यासमोरही मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान उभे आहे. त्यामुळे कोणता उमेदवार या दिव्यातून विजयाचा गुलाल उधळणार ? हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिव सेना युती तोडून एकमेकांच्या विरोधात लढल्याने हिंदू मतांचे विभाजन झाले होते. याचा थेट फायदा एमआयएमला झाला होता. आता २०२४ मध्ये काहीसे असेच चित्र आहे. फुटीनंतर दोन्ही शिवसेना आणि एमआयएम यांच्या लढत असल्याने दोन्ही सेनेतील भांडणाचा फायदा आपल्याला होईल, अशा गुदगुल्या एमआयएमला होत आहेत.
शिंदे गटाचे उमेदवार जैस्वाल हे मध्यचे विद्यमान आमदार आहेत. परंतु पूर्वीप्रमाणे त्यांचा दांडगा जनसंपर्क राहिलेला नाही. बहुतांश जुने कार्यकर्ते, समर्थक त्यांच्यापासून दुरावले आहेत. काहींची नाराजी असल्याने ते प्रचारापासून अलिप्त आहेत. ज्यांच्यावर मदार आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद आणि धुसफूस सुरू असल्याने याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल, भाजपाकडून किशनचंद तनवाणी आणि इम्तियाज जलील यांच्या लढत झाली होती. यात जलील है पहिल्यांदाच विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण ६१,८४३ मते मिळाली होती. शिवसेनेचे जैस्वाल है ४१,८६१ मतांसह दुसन्य तर, भाजपाचे तनवाणी ४०,७७० मते घेत तिसऱ्या स्थानावर होते. जैस्वाल यांचा १९.९८२ मतांनी पराभव झाला होता.