Maharashtra Assembly Poll : विलास औताडेंच्या पदयात्रेला चिकलठाणा परिसरात गर्दी

विलास औताडेंच्या पदयात्रेला चिकलठाणा परिसरात गर्दी
Maharashtra Assembly Poll
विलास औताडेंच्या पदयात्रेला चिकलठाणा परिसरात गर्दी pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी- गृहमंत्री अमित शहा यांची जोडी लोकांच्या मुद्द्द्यावर बोलायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तरीही त्यांची कर्जमाफी होत नाही. मात्र अदानीसोबत हातमिळवणी करून त्यांनी जनतेने बनवलेले सरकार पाडले. त्यामुळे आता मोदी-शहा यांच्या जोडीपासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनाच मतदान करा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांनी गुरुवारी (दि.१४) जळगाव फेरण येथील सभेत केले. तर चिकलठाण्यातील पदयात्रेला नागरिकांनी गर्दी करून जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी भाऊसाहेब जगताप, अमजद खान, राहुल सावंत, सलीम इनामदार, राजू डोंगरे, असिफ अली, सुरेश पवार, बापूसाहेब दहीहंडे, भाऊसाहेब दहीहंडे, राजू शेख, रामेश्वर कोरडे, सचिन वाघ, सोमीनाथ नवकुटे, रामभाऊ बनकर यांच्यासह कार्यकर्ते व मविआचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या पदयात्रेत चिकलठाण्यातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यात तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता.

Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Poll : वॉर्डातील सर्व समस्या सोडवणारच : विलास औताडे यांची ग्वाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news