Maharashtra Assembly Poll:'शहराचे नामांतर केलं म्हणता, मग मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे?'

शहराचे नामांतर केले म्हणता, मग मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? : उद्धव ठाकरे
Maharashtra Assembly Poll
शहराचे नामांतर केले म्हणता, मग मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? : उद्धव ठाकरे pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर करून आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. परंतु संभाजीनगर कुठे आहे. नामांतर केले असेल तर मग मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे, असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.१७) सायंकाळी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. व्यासपीठावर पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह जिल्ह्यातील मविआचे उमेदवार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदीवर कठोर शब्दांत टीका केली.

विधानसभेची ही लडाई महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्राला लुट्न नेणारे यांच्यातील लढाई आहे, असा घणाघात ठाकरे यांनी सुरुवातीलाच केला, पंतप्रधानांच्या आज शहरात झालेल्या सभेचा संदर्भ देऊन ते म्हणाले, आज मोदी येथे येऊन थापा मारून गेले. आम्ही शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले. मात्र नामांतराचा ठराव आमच्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्येच आम्ही मंजूर केला होता. आज ते जर माणत असतील की त्यांनी नामांतर केले तर मला विचारायचे आहे. कुठे आहे संभाजीनगर. कारण आजही मतदारसंघांची नावे औरंगाबाद अशीच आहेत.

आज मोदी कुठे आले होते, औरंगाबाद पूर्वमध्ये आले होते की, औरंगाबाद मध्यमध्ये, मोदींचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने ज्या तत्परतेने माझा पक्ष आणि चिन्ह चोरून दुसऱ्याला दिले, त्या तत्परतेने त्याच आयोगाने या मतदारसंघांची नावे का बदलली नाहीत, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला, चिकलठाणा विमानतळाचे नाव बदलून आम्ही छत्रपती संभाजीराजे विमानतळ करण्यापाचा ठरावही मंजूर केला होता. परंतु, तुम्ही ते नामांतर केले नाही. तिकडे गोव्याच्या विमानतळाचे नामांतर केले, अयोध्येचे केले, असेही उद्धव ठाकरे महणाले.

२० मिनिटांचे भाषण; एमआयएमबाबत शब्दही नाही

उद्धव ठाकरे ८.१५ वाजता भाषणाला उभे राहिले. त्यांनी बरोबर ८.४५ वाजेपर्यंत म्हणजे, २० मिनिटे भाषण केले. यात त्यांनी उद्योगावर ३ मिनिटे, शहर आणि विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीनगर करणे ३ मिनिटे, कोकणचा पुतळा १ मिनीट आणि बॅग तासणी १ मिनीट बोलून उर्वरित वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फड़णवीस, एकनाथ शिदे यांच्यावर जोरदार टीकास सोडले. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी कुठेही मध्य आणि पूर्व मतदारसंघात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ; एमआयएमविरोद्ध अवाक्षरही काढले नाही.

माझ्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचे खुळ घुसले नाही

मला मोदी, शहा घरी बसवू शकत नाही. तुम्ही सांगितले तर मात्र नक्की परी बसेल. कारण मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी लढतोय, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता जी पायदळी तुडवली जात आहे, तिचे रक्षण करण्यासाठी मी लढतो आहे. मुख्यमंत्रिपदाचे खुळ माझ्या डोक्यात नाही. असे उद्धव ठाकरे महणाले.

Maharashtra Assembly Poll
औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर, नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव, शिंदे सरकारचा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या