Maharashtra Assembly Poll : सतीश चव्हाण यांचे अगड 'बंब' आव्हान

सतीश चव्हाण यांचे अगड 'बंब' आव्हान
Maharashtra Assembly Poll
सतीश चव्हाण यांचे अगड 'बंब' आव्हान file photo
Published on
Updated on
विनोद काकडे

छत्रपती संभाजीनगर: गंगापूर मतदारसंघात राष्टवादी (शरद पवार गट) चे सतीश चव्हाण आणि भाजपाने उमेदवार प्रशांत बंब यांच्यात काट्याची फाईट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच आरक्षणावरून मराठा समाजात असलेला रोष, त्यातच एन्टी इन्कबन्सी आणि भरीसभर म्हणून भाजपात झालेली बंडखोरी, याबाबींमुळे बंब यांची यंदा चांगलीच अडचण झाली आहे. त्यावर मात करीत सतीश चव्हाण यांनी निर्माण केलेले अगड मबंबफ आव्हान प्रशांत बंब कसे पेलतात, हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

गेल्या तीन टर्मपासून प्रशांत बंब हे गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. चौथ्यांदा पुन्हा एकदा ते भाजपच्या तिकिटावर या मतदार संघातून नशीब आजमवित आहेत. गेल्या तिन्ही निवडणुकांत बंब यांच्याविरोधात मसर्वचफबाबीने तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी एकहाती विजय मिळवला. यंदा मात्र पहिल्यांदाच बंब यांना सतीश चव्हाण यांनी नाकी नऊ आणणारे आव्हान उभे केले आहे.

पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेल्या सतीश चव्हाण हे गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघावर डोळा ठेवून होते. आपला पदवीधर मतदारसंघाचा बहुतांश निधी त्यांनी याच तालुक्यासाठी वापरला. शिवाय येथून लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी पाच वर्षांमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांचे गावागावात नेटवर्कही उभे केले. हे नेटवर्क त्यांना या प्रचारासाठी खूप फायदेशीर ठरल्याचे दिसून आले आहे. चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यात जवळपास संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुनर्जीवित करण्याचे काम केले. या प्रचारात चव्हाण यांना शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसची चव्हाण यांना जशी साथ मिळाली, तशी प्रशांत बंब यांना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ मिळाली नाही, हे वास्तव आहे.

एक तर सलग पंधरा वर्षांपासून आमदार असल्याने बंब यांच्याविरोधात एन्टी इन्क्मबन्सी आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात खूप प्रभावी असल्याने लोकसभेतही दिसून आले होते. चव्हाण मराठा असल्याने हा मुद्दाही बंब यांना डोकेदुखी ठरत आहे. त्यातच भाजपाचे पदाधिकारी सुरेश सोन- वणे यांनी केलेल्या बंडखोरीने बंब यांच्या आडचणीत भर घातली आहे. सोनवणे ओबीसी असल्याने या वर्गाच्या मतविभाजनाचा फटका बंब यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशातच बंब यांनी शिक्षकांबाबत केलेले विधान, गावागावांत प्रचारसभांमध्ये विरोध झाल्यानंतर बंब यांनी वापरलेली भाषाही मतदारांची नाराजी वाढविणारीच ठरली आहे. बंब यांच्या याच नकारात्मक गोष्टींचा फायदा सतीश चव्हाण यांनी संपूर्ण प्रचारात घेतल्याचे दिसून आले. अशा या एकंदरीत परिस्थितीमुळे चव्हाणांनी निर्माण केलेले अगडफ्बंबफ आव्हान प्रशांत बंब कसे पेलतात, हे निकालानंतरच दिसून येईल.

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ

जमेच्या बाजू

  • गावागावात उभारलेले तगडे नेटवर्क, कार्यकर्त्यांचे जाळे

  • तालुक्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा वापरलेला मोठा निधी. साथ स्वतःच्या कार्यकर्त्यांचे

कमकुवत बाजू

• राष्ट्रवादीचे तालुक्यात नसलेले अस्तिव

• मत्र पक्षांची लवकर न मिळालेली साथ

जमेच्या बाजू

■ मतदार संघासाठी आणलेला मोठा निधी

■ कार्यकर्त्यांचे आणि पक्षाचे गावागावात असलेले तगडे नेटवर्क

■ स्थानिक उमेदवार म्हणून ओळख

कमकुवत बाजू

  • विकास कामाकडे झालेले दुर्लक्ष

  • भाजपात झालेली सुरेश सोनवणे यांची बंडखोरी

  • आरक्षावरून असलेला मराठा समाजातील रोष

  • शिक्षकांविरोधातील भूमिका

Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Poll :'रवींद्र चव्हाण यांना विजयी करणे हीच वसंतरावांना श्रद्धांजली'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news