Maharashtra Assembly Poll : निवडणुकीच्या प्रचारातून हरवला विकासाचा मुद्दा

परभणी : निवडणुकीच्या प्रचारातून हरवला विकासाचा मुद्दा; केवळ आरोप-प्रत्यारोपांच्याच फैरी
 Maharashtra Assembly Poll
निवडणुकीच्या प्रचारातून हरवला विकासाचा मुद्दाfile photo
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यातील असंख्य विकासाचे प्रकल्प अर्धवट राहिले असताना तसेच मूलभूत सुविधांचीच वानवा असतानाही विकासाच्या मुद्द‌धावर निवडणूक केंद्रीत करण्याऐवजी प्रथ ारातून आरोप प्रत्यारोपांच्याच फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे विकासाचा मुद्दाच हरवल्याची जाणीव मतदारांना होत आहे.

दळणवळणाचीच साधने उपलब्ध असतानाही केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी विकासाचे प्रकल्प आणलेच गेले नाहीत. केवळ जातीपातीच्या गणितांमध्ये निवडणुका अडकून पडल्या, मूलभूत विकासाचे प्रश्न देखील मार्गी लागू शकलेले नाहीत. महानगरपालिका असूनही एखाद्या मोठा ग्रामपंचायतीसारखी अवस्था परभणी शहराची झालेली आहे. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून ऐरणीवर आहे. रस्त्यांतील खड्डे व धुळीच्या साम्राज्याचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पाणी असूनही आठ-आठ दिवसाला ते उपलब्ध होते.

स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. मुळातच रस्ते, नाल्या यांसह स्वच्छतेच्या प्रश्नामुळे या महानगराला बकाल स्वरूप आलेले असताना गेल्या ३० वर्षापासून अधिक काळ शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. उलट या प्रश्नांची व्याप्तीच शहराच्या विस्ताराप्रमाणे वाढत गेलेली आहे. वाट्टेल त्या ठिकाणी थाटली गेलेली अतिक्रमणे ही या राजकीय मंडळींचाच बरदहस्त असल्याचा परिपाक आहे. मात्र सातत्याने आपण विरोधी पक्षात असल्याचा व पर्यायाने नाईलाज झाल्याचा अर्विभाव सादर केला जातो. बसपोर्टच्या कामाला आठ वर्ष तर नाट्यगृहाच्या कामाला ५ वर्षपिक्षा जास्त कालावधी लोटला जातो. हे सर्व प्रश्न रखडलेले असताना नवे विकास प्रकल्प तर येऊच शकले नाहीत.

या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या प्रचारातून विकासाचा मुद्दा समोरच केला जात नाही. रोजगारासाठी काय उपायोजना के ल्या जाणार याचे उत्तर कोणताही उमेदबार देऊ शकत नाही. मूलभूत विकासाच्या प्रश्नांसाठी निधीची उपलब्धता हाही प्रश्न मांडला जात नाही. शहरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतरणाच्या प्रश्नावरही सत्ताधारी व विर- ोधक उत्तर देत नसल्याने नागरिक मात्र यांच्या पोकळ आश्वासनांवरच अवलंबून आहेत.

वैयक्तिक टिकांचे सत्र

परभणी मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडालेला असताना दोन्ही बाजूनी केवळ आरोप-प्रत्यारोप करूनच थांबलेले नाहीत. तर वैयक्तिक पातळीवर जाऊन अत्यंत स्वालच्या भाषेत टिकाटिप्पणी केली जात आहे. १० वर्षापासून आमदारकी भूषविणारे देखील विकासाबाबत ठोस भूमिका मांडत नाहीत, जनता मात्र हे ऐकण्याचेच काम करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news