लातूर, पुढारी वृतसेवा : निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. जनतेने निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीने काय काम केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध केला त्यामधून काय विकासकामे केली हे सांगणे आवश्यक असताना या सर्व महत्त्वाच्या विषयाला बगल देत विरोधकाकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. जनतेने निवडून दिल्यानंतर दहा वर्षांत मतदारसंघाच्या विकासात तुमचे काय योगदान आहे हे जनतेला सांगा मी माझ्या पाच वर्षांत केलेले विकासकामे सांगतो. मी जनतेच्या प्रश्नासंदर्भात विधीमंडळात शेकडो प्रश्न उपस्थित करून जनतेच्या प्रश्नासंदर्भात भांडलो आहे. तुम्ही काय केले ते सांगा? असा सवाल आमदार अभिमन्यू पवार यांनी विरोधकांना केला आहे.
मतदारसंघातील गुळखेडा, गुळ खेडा वाडी, तावशीताड, चिंचोली काजळे व मासुर्डी येथील जनतेशी दि.१३) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की मतदारसंघातील चौफेर विकासासाठी मी पाच वर्षांत भरघोस निधी उपलब्ध करून मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. हे करीत असताना जनतेच्या हितासाठी विधीमंडळात शेकडो प्रश्न उपस्थित करून येथील जनतेच्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर कोटींची आली अगोदर शिथिल अट आला संदर्भात तीन मदत त्या माध्यमातून देण्यात.
जनावरांच्या गोट्या साठी सहा जनावरांची अट होती ती करून केवळ दोन जनावरांची ठेवण्यात आली त्यांमुळे अडीच हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना जनावरांच्या गोटयाचा लाभ घेता . सिंचन विहीर अनुदान वाढी मी केलेल्या पाठपुराव्यामुळे लाखांवरून हे अनुदान आता पाच लाखापर्यंत होऊ शकले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण आखून लामजना, बोरफळ व कासारसिरसी शाळा अद्ययावत करण्याचे काम केले ज्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधासह क्रीडा व मैदानी खेळातील खेळाडू निर्माण होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने बीजपुरवठा व्हावा यासाठी मतदारसंघात १० नवीन वीज उपकेंद्राची निर्मिती केली जात आहे.
ज्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सुरळीत व उच्च दाबाने विद्युत पुरवठा होईल. हे ना असे शेकडो कामे मी या पाच वर्षांत केले आहेत. तुम्ही दहा वर्ष आमदार म्हणून काम केले तुम्ही एकतर काम जनहिताचे सांगा असा सवाल विरोधी उमेदवाराला आमदार अभिमन्यू पवार यांनी करीत या पाच वर्षांत जातीय सलोखा ठेवून समाजाच्या प्रत्येक घटकाला समान न्याय देण्याच्या भूमिकेतून काम केले असल्याचा दावा केला आहे.