लातूर, पुढारी वृतसेवा: वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच विधानसभा निवडणूक व मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत लातूर शहरातील आणखीन तीन गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे (वय २१ रा. गणेश नगर आदर्श कॉलनी लातूर), जावेद शरफुद्दीन मुल्ला (वय ४० वर्ष रा. औराद शहाजानी) व करण पांडुरंग पवार (वय २३ रा., भामरी चौक, लातूर), अशी त्यांची नावे आहेत.
एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन् हेगारी रोखण्यासाठी, तसेच विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावे याकरिता लातूर पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील १५ गुन्- हेगारावर एम.पी.डी.ए. नुसार करण्यात आलेली कारवाई आहे. या कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील १५ गुन्- हेगारावर एम.पी.डी.ए. नुसार करण्यात आलेली कारवाई आहे.
उपरोक्त गुन्हेगाराविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये वाळू तस्करी, शस्त्रासह शरीराविरुद्ध, जबरीने मालमत्ता चोरी करण्याचे गुन्हे, मालमत्ता चोरीचे गुन्हे, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. जनसामान्यात त्याची भीती होती.
त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अमलमदार संतोष खांडेकर, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक नेटके, विष्णू वायगावकर, पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकामधील सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिनगारे, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पोलिस अमलदार दीपक बोंदर, रणवीर देशमुख, सारंग लव्हारे यांनी प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविला होता. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी तो मंजूर केला असून आरोपींची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.