Maharashtra Assembly Poll : आमदार शिरसाट उबाठाच्या कार्यकर्त्यांवर भडकले

आमदार शिरसाट उबाठाच्या कार्यकर्त्यांवर भडकले
Maharashtra Assembly Poll
आमदार शिरसाट उबाठाच्या कार्यकर्त्यांवर भडकलेpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम मतदारसंघातील गुरू तेग बहादूर मतदान केंद्रावर बुधवारी (दि. २०) दुपारी महायुतीचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी शिरसाट यांना मशाल दाखवत घोषणाबाजी केली. त्यामुळे चिडलेल्या शिरसाट यांनी मस्ती आला का, नीट करील, असे म्हणत या कार्यकर्त्यांना दम भरला.

महायुतीचे उमेदवार शिरसाट हे मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देत फिरत होते. दुपारी ते उस्मानपुरा भागातील गुरू तेग बहादूर शाळेच्या मतदान केंद्राजवळ आले. त्यावेळी ठाकरे गटाच्या नितीन पवार व इतर कार्यकर्त्यांनी मशाल चिन्ह दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे संतापलेले संजय शिरसाट नितीन पवार यांच्याजवळ गेले.

तिथे गेल्यावरही घोषणाबाजी सुरू राहिल्याने शिरसाट यांनी मस्ती आली का, नीट करील साल्या, असे म्हणत दम भरला. त्यानंतर इतरांनी मध्यस्ती केल्याने वाद शांत झाला. काही वेळाने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नितीन पवार व इतर कार्यकर्त्यांची विचारपूस केली.

Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Poll : संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदेंचा लागणार कस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news