.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी विधानसभा मतदारसंघांत आगामी विधानसभा निवडणुकीत पंचरंगी सामना रंगणार असल्याचे आज नामनिर्देशन मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आमदार राजेश टोपे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण अपक्ष सतीश घाटगे, माजी आमदार शिवाजी चोथे व वंचितच्या कावेरी बळीराम खटके हे मातब्बर उमेदवार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील घनसावंगी मतदार संघात एकूण ५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २९ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण २३ उमेदवार रिंगणात असणार आहेत. उमेदवारासाठी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी नामनिर्देश मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत २९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १००-घनसावंगी विधानसभा मतदार संघातील २३, उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
मतदार संघात एकूण ५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २९ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण २३ उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.