

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : माझ्या लाडक्या आमदाराच्या नावात साक्षातच बालाजी आहे. त्यामुळे भगवान बालाजीचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहेच. त्याला आता तुम्हा जनता जनार्दनाचे आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही त्याला २०१९ प्रमाणे विधानसभेत पाठवा. त्याच्या आडनावात कल्याणकर असून तो या मतदार संघाचे कल्याण करेल, त्याच्या वतीने हा एकनाथ शिंदे शब्द देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या नावाचा विगृह अतिशय खुबीने करताच असंख्य. मतदार श्रोत्यानी टाळ्यांच्या कडकडाट करत शुक्रवारी (दि.१५) भक्ती लान्स येथे डोक्यावर घेतले. आणि मुख्यमंत्र्यांच्या महायुतीला विजयी करण्याच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला.
तत्पुर्वी, भाजपाचे नवनेते खा. अशोकराव चव्हाण यांचेही रंगतदाव भाषण झाले. नेत्यांच्या एकजुटीचा फायदा नांदेड विकसीत होण्यासाठी बसला पाहिजे, त्यासाठी नांदेड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भजपाचे डा. संतुकराव हंबर्डे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार शिंदे शिवसेनेचे आ. बालाजीराव कल्याणकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रचाराची मुदत संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना आ. कल्याणकर यांनी गृहभेटी व व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी देत मतदानाचे आवाहन केले. तरोडा येथे दररोज भाजी बाजार भरतो. येथेही उमेदवार भाजी विक्रेते आणी ग्राहकांच्या भेटी घेत स्वतःचा प्रचार करत आहेत. महिला कारकर्त्या दुपारच्या वेळी अंतर्गत भागात घरोघरी भेटी देऊन महिला मतदारांना धनुष्यबाण व कमळाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे सर्वांचे कल्याण करणारे आहे. अडीच वर्षामध्ये त्यांनी सुमारे अडीच हजार कोटींचा निधी माझ्या मागे लागून आणला आणि बहुतांश विकासकामे के ली आहेत. आता त्यांना पुन्हा निवडून द्या, तुमचा राहिलेला विकास शंभर पूर्ण केल्याशिवाय ते राहणार नाहीत. मी त्यांच्यासोबतच आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.