सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : मतदार संघात झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांनी विरोधकांचे अवसान गळाले आहे. त्यामुळे त्यांची जीभ अडखळू लागली असून मतदारच त्यांची बोलती बंद करीत आहे. मतदारांचा सर्वत्र मला मिळत असलेला उस्फुर्त प्रतिसाद पाहून त्यांना पळता भई झाली आहे. आता काय बोलावं व काय करावं त्यांना सुचत नसून, सर्रासपणे खोट्या अफवा पसरवित फिरत आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी केले. बोरगाव कासारी येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ भवन गटातील बोरगाव कासारी या गावात पदयात्रा व प्रचार फेरीनंतर प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी अब्दुल सत्तार यांनी विरोधकांचा समचार घेतांना कुणाचेही नाव न घेता कडाडून हल्ला केला. विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नसल्याने खोटे नाटे आरोप करून केवळ ते बदनामी करत आहे.
मतदार संघ शासनाच्या योजना व विकास काम करताना भवन गटातील अनेक गावांत गावांतर्गत रस्ते, सिंचन शिक्षण आरोग्य, शेतकऱ्यांच्या मालाच्या सुर- क्षेसाठी (कोल्ड स्टोरेज) शीतगृह, रोजगार निर्मित उद्योग व पाणीपुरवठा आदी विकास योजनाच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे तसेच मतदारांशी म जुळलेली नाळ व त्यांच्याशी असलेले अतुट नाते व दांडग्या जनसंपर्काच्या बळावर मतदारांची मने जिंकलेली आहे. या जोरावच माझा विजय निश्चीत असल्याचे यावेळी सत्तार म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी गावाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव होते. रामदास पालोदकर, विनोद मंडलेचा, नंदकिशोर सहारे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.