कसबा बावडा (कोल्हापूर) : विधानसभा निवडणुकीमध्ये २७५-करवीर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी निवडक सहकाऱ्यांसह राहुल पी. एन. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवार अखेर तीन उमेदवारांचे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवार अखेर २६ व्यक्तींना ४६ अर्जांची विक्री झाली आहे. गुरुवारी गुरुपुष्यांमृतचा योग साधून २७५-करवीर विधानसभा मतदारसंघातून राहुल पांडुरंग पाटील २ अर्ज तेजस्विनी राहुल पाटील २ अर्ज तर संताजी घोरपडे यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केला.
२२ ऑक्टोंबर पासून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी ९ व्यक्तींना १६ अर्ज, दुसऱ्या दिवशी १४ व्यक्तींना २५ अर्ज तर गुरुवारी ३ व्यक्तींना ५ अर्ज विक्री करण्यात आले. गुरुवार अखेर २६ व्यक्तींना ४६ अर्ज विक्री झाले आहेत.
राहुल पी. एन. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघान यांच्याकडे दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार जयंत आजगावकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय पवार, गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, बाजीराव खाडे आदी उपस्थित होते.