फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद वाढवूया : शेखर गोरे

Maharashtra Assembly Polls | जिल्ह्यातील भाजप उमेदवारांना विधानसभेत पाठवा
Maharashtra Assembly Polls |
बनगरवाडी येथे माताभगिनींनी सेल्फी घेण्याचा हट्ट धरल्यानंतर स्वत: सेल्फी फोटो काढताना शेखर गोरे.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

म्हसवड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा भाजप महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांची ताकद वाढवणे गरजेचे आहे. यासाठी माण-खटावचे भाजपचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांच्यासह कराड उत्तर, दक्षिण, सातारा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून विधानसभेत पाठवा, असे आवाहन सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी केले. माण-खटाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आ. जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ माण तालुक्यातील गावभेटीदरम्यान ते बोलत होते.

शेखर गोरे म्हणाले, माण-खटावची राष्ट्रवादी फलटणला महाराजांच्या वाड्यात गहाण ठेवली गेलीय. जोपर्यंत त्यांच्या दावणीला माण-खटावची राष्ट्रवादी आहे, तोपर्यंत माण-खटावमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आमदार होणे अशक्य आहे. त्यांना कायम मुजरा घालणारी लोक हवे आहेत. जे स्वार्थापोटी दोन डगरीवर हात ठेवतात त्यांना विचारुन उमेदवारी ठरवण्यात येते. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळेच ते आपल्या गटात प्रवेश करत आहेत. या निवडणुकीत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

शेखर गोरे पुढे म्हणाले, सख्ख्या भावाविरोधात मी 12 वर्षे संघर्ष केलाय. राष्ट्रवादीने माझ्यावर अन्याय केला ते बरेच झाले नाहीतर आम्ही कधीच एकत्र आलो नसतो. आता एकत्र आलोयच तर विरोधकांनाही दाखवून देतो, भाऊ-भाऊ एकत्र आल्यावर काय होत ते. खटाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ, असे स्वप्न पाहणार्‍या विरोधकांचा स्वप्नभंग करणार असून जयाभाऊंना आपण मताधिक्य मिळवून देणार, हा आपला शब्द आहे. एका मराठी चित्रपटात विंचू तात्या ओम फट स्वाहा म्हणत लक्ष्याच्या छाताडावर बसून गळा दाबून त्याला मारायचा प्रयत्न करत होता. त्याच्या पुढे जाऊन आपल्या मतदारसंघात परबू तात्यांनी असा प्रकार केला आहे. ओम फट स्वाहा म्हणत कारखान्यात एका कामगाराचा खून केला आहे. अशा विंचू तात्याचा बंदोबस्त करून त्यांना घरीच बसवावे लागेल, नाहीतर हा खटावचा विंचू तात्या अजून अनेकांच्या छाताडावर बसून ओम फट स्वाहा म्हणेल, असेही ते म्हणाले.

मायणीच्या काळ्या गॉगलला दिवसा तारे दाखवू

कायम डोळ्यावर काळी झापड लावणार्‍या मायणीच्या काळ्या गॉगलवाल्याने आमच्या गोर्‍यांच्या नादाला लागू नये. बोराटवाडीत वाघ राहतात हे बहुतेक मायणीच्या या कोल्ह्याला माहीत नसेल. सगळ्या गोर्‍यांची तुम्हाला गरज नाही, मी एकटा बास आहे. बोराटवाडीत यायची पण गरज नाही, फक्त एकदा सांगा कुठं येऊ ते. तुमच्या काळ्या झापडासह तुम्हाला दिवसा तारे दाखवतो, असा इशारा शेखर गोरे यांनी सुरेंद्र गुदगे यांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news