

राशिवडे: राधानगरी,भुदरगड,आजरा विधानसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) के.पी.पाटील यांनी मोजक्या कार्यकर्त्यासह उमेदवारी अर्ज निवडणुक अधिकारी हरिष सुळ यांचेकडे दाखल केला. यावेळी शिवसेनेचे(उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख शमनजी, विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे मुकुंद देसाई,उदय पवार(आजरा) भुदरगड काॅग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई,आर.व्ही.देसाई, राधानगरी काॅग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, गोकुळचे संचालक किसन चौगले,राजु भाटळे आदी उपस्थित होते.