‘मला तोंडघशी पाडायची काय गरज होती?’, मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील संतापले(Video)

राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम
Satej Patil
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी खासदार शाहू छत्रपती यांच्यावर आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती सोमवारी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी सतेज पाटील हे संतापलेले दिसले.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे काय बरोबर नाही महाराज. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा.’

दालनातूम बाहेर आल्यानंतर सतेज पाटील हे संतप्त झालेले. बाहेर येताच त्यांनी, ‘दम नव्हता तर उभायचं नव्हतं. मी पण दाखवली असती माझी ताकद.’ असा राग व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज (दि.४) शेवटचा दिवस होता. दरम्‍यान, राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

कोल्हापूर काँग्रेसमधून सुरूवातीला राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर लाटकर यांच्या उमेदवारीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर काँग्रेसने पुन्हा मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, कोल्हापूर उत्तरची निवडणुक महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास अघाडीच्या मधुरिमाराजे छत्रपती अशी लढत अधिक अतितटीची आणि प्रतिष्ठेचे बनली होती. मात्र आज मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news