सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्यातील इच्छुकांच्या मुलाखती चालू केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी अंतरवली सराटी मुलाखती दिल्या. सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 30 ऑक्टोबरला इतर पक्षांच्या उमेदवारीचा कानोसा घेऊन उमेदवारी यादी जाहीर करणार आहेत. यादीमध्ये नाव असलेल्यांची उमेदवारी कायम ठेवत इतर उमेदवारांनी अर्ज काढून घेण्याच्या सूचनाही त्यांनी इच्छुक मराठा उमेदवारांना दिल्या आहेत.
एका जातीच्या भरवशावर निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे इतर जातीधर्मच्या उमेदवारांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या जागी मराठा समाजाची ताकद आहे, त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे. राखीव मतदारसंघात इतर पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरूवारी (दि. 24)घेतल्या आहेत. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील 160 इच्छुक गेले होते. सर्व उमेदवारांशी जरांगे यांनी संवाद साधला आहे. मोहोळ मतदारसंघातील उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा आहे. दोन दिवस झाले मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. गुरूवारी चालू झालेल्या मुलाखती शुक्रवारी (दि. 25) सकाळपर्यंत चालू होत्या.
महायुती, महाविकासमधील नाराज जरांगेंकडेउमेदवारी कोणाला मिळणार हे मला माहीत नाही; मात्र युती आणि महाविकास आघाडीचा आपल्याला सुफडासाफ करायचा आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराज मंडळी उमेदवारीसाठी अंतरवली सराटीमध्ये येऊन जरांगे यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यामुळे सर्वांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.