

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्र हे हॉट सीट बनले आहे. या विधानसभा क्षेत्रात भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये मुख्य लढत असून भाजपाचे बंडखोर मात्र ज्यांना पक्षातून हकालपट्टी झालेली नाही असे भाजपचे उमेदवार अमोल शिंदे हे रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे पाचोरा भडगाव मध्ये त्रिशंकू लढत होणार आहे. यात लढतीमध्ये पाचोऱ्याचे माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील (तात्यासाहेब) यांचे वारस मुख्य शिलेदार ठरणार आहेत. मात्र पाचोरा मतदारसंघात सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पाणी ठरणार आहे. पाचोरा भडगावमध्ये आजही तब्बल पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. कधी कधी हा पाणी पुरवठा आठ दिवसांवर जात असल्याचे नागरिकांकडून ओरड होते. (Kishor Patil vs Vaishali Suryawanshi Pachora Vidhan Sabha Constituency)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघात किशोर पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेकडून आमदार झाले होते. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर किशोर पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंनी त्यांना पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदार संघातून संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या बहीण वैशाली सुर्यवंशी यांना मैदानात उतरवले आहे.
राज्याच्या शेवटच्या सीमा भागात असलेला जळगाव जिल्हा हा अकरा विधानसभा मतदासंघाचे क्षेत्र आहे. या अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये रावेर, जळगाव, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव हे सर्वाधिक लक्षवेधी विधानसभा क्षेत्र आहे. या विधानसभा क्षेत्रांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. गेल्या वेळेस शिवसेनेमध्ये फूट पडून दोन भाग झाल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या विधानसभा क्षेत्रात होणार आहे. त्यामध्ये भाजपाचे बंडखोर अमोल शिंदे यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतलेली आहे, तर गेल्या वेळेस त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.
त्यामुळे पाचोरा भडगाव या मतदारसंघावर तात्या पाटील (तात्यासाहेब रघुनाथ ओंकार पाटील आर. ओ. पाटील) यांचे वारसदार किशोर पाटील व त्यांची मुलगी वैशाली सूर्यवंशी हे विजयी होणार का ? यांच्या भांडणांमध्ये अमोल शिंदे बाजी मारणार हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे
या निवडणुकीमध्ये पाचोरा भडगाव मध्ये महत्वाची समस्या म्हणजे उन्हाळा ऋतूमध्ये होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे हाल हा महत्त्वाचा व सर्वात कळीचा मुद्दा ठरू शकतो. उन्हाळ्यात आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो तर सद्यस्थितीत हिवाळा ऋतुमध्ये पाच दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत आहे. येथे अद्यापही नदीत जोड प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आलेले नाही. शहराला गिरण ओझर बंधाऱ्यावरून पंपिंगद्वारे पाणीपुरवठा होतो आहे. परंतु जर ते सुद्धा बंद पडले तर शहराला पाणीपुरवठा कुठून होईल हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे.
पाचोर्यातील व भडगाव मधील समस्या पाहता त्यांचे स्वप्न मुलगी किंवा किशोर पाटील हे वारसदार ठरवणार का? घरातच युद्ध सुरू झालेले असल्याने बाहेरच्यांना चांगली संधी चालून आली आहे.