अकोला जिल्ह्यात महायुती 3, तर आघाडी 2 जागांवर विजयी

अकोला पश्चिमचा गड कॉंग्रेसने जिंकला
Maharashtra Assembly Elections 2024
File Photo
Published on
Updated on

अकोला : अकोला जिल्ह्यात महायुतीने अकोला पूर्व, अकोट व मूर्तिजापूर पुन्हा काबीज करत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने बाळापूर आणि अकोला पश्चीम या दोन जागांवर विजय प्राप्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीला एकही जागी विजय मिळाला नाही. अकोला पूर्व मतदार संघात भाजपाचे आ. रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक केली आहे. सलग तिसऱ्यांदा 51 हजारांच्या वर मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

अकोला पूर्व मतदार संघात भाजपाचे आ.रणधीर प्रल्हादराव सावरकर 1 लक्ष 08 हजार 619 तर शिवसेना उबाठाचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख गोपाल रामराव दातकर – 58 हजार 6 तर वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर शंकर सुलताने यांना 50 हजार 681 मते मिळाली. अकोट मतदार संघात भाजप- आ प्रकाश भारसाकळे- 93338 (विजयी) काँग्रेसचे महेश गणगणे- 74487 तर वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांना 34132 मते मिळाली. अकोट मतदार संघातून भाजपचे प्रकाश भारसाकळे 18851 मतांनी विजयी झाले आहेत.

मूर्तिजापूर मतदार संघात भाजपाचे हरिश पिंपळे हे 35864 मतांनी चौथ्यांदा निवडून आले. पिंपळे यांना 91820, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना 55956, तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांना 49608 मते मिळाली. अकोला पश्चिम मतदार संघात काट्याची टक्कर झाली. कॉंग्रेसचे साजिद खान पठाण यांना 88718 मते मिळून पठाण विजयी झाले. तर भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची 87435 मते मिळाली. बाळापूर मतदार संघात शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांनी आपली जागा राखत विजय मिळवला. त्यांना 77369, वंचित बहुजन आघाडीचे नातिकोद्दिन खतिब यांना 65936 तर शिंदे सेनेचे बळीराम सिरस्कार यांना 57613 मते मिळाली. मात्र अद्याप बाळापूर मतदार संघात कोणाला किती मते मिळाली यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news