गडचिरोली: गोविंदपूर येथे १११ वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Assembly Polls | १११ वर्षांच्या आजींचा उत्साह आदर्शवत
Gadchiroli Mulchera 111-year-old voter
फुलमती सरकार या १११ वर्षीय वृद्धेने व्हील चेअरवरून मतदानाचा हक्क बजावला. Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील फुलमती बिनोद सरकार या १११ वर्षीय वृद्धेने आज (दि.२०) उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रियासुद्धा राबविण्यात आली. मात्र, फुलमती सरकार यांनी मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

आजीबाईंचे मतदान केंद्रावर आगमन होताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्प वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले. मतदानानंतर अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांचा शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कोरोना काळात लसीकरणातही पुढाकार

फुलमती सरकार यांनी लोकसभा  निवडणुकीमध्येदेखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले होते. एवढंच नाही तर कोरोना महामारीच्या काळात फुलमती सरकार यांनी स्वत: लसीकरण करुन इतरांनाही लस घेण्याचे आवाहन केले होते.

Gadchiroli Mulchera 111-year-old voter
गडचिरोली: अतिसंवेदनशील ३७ मतदान केंद्रे सुरक्षित ठिकाणी होणार स्थानांतर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news