

कल्याण : पुढारी वृत्तसवा : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी रोहित कुमार राजपुत यांच्याकडे दाखल केला.
भाजपने कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. यावेळी महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, मोहणे टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, सदा कोकने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेशळी ढोल ताशाचां गजरात शक्तिप्रदर्शन करीत भव्य रॅली काढली होती.
नरेंद्र पवार म्हणाले की, कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपची ताकद आहे. कल्याण पूर्वेत भाजपच्या अधिकृत उमेदवारास विरोधात शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.