

जळगाव : आजच्या निकालामध्ये प्रचंड घोळ दिसत आहे समोरच्या उमेदवाराला ज्या गावात प्रचाराला साधी माणसे देखील उपलब्ध नव्हती, त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्य दिसत आहे. पण शेवटी निकाल तो निकालाच आहे. या निकालाची चौकशी झालीच पाहिजे. एवढ्या प्रमाणात मते कशी मिळत आहेत? असा प्रश्न रोहिणी खडसे यांंनी उपस्थित केला आहे मतदानाच्या दोन दिवस अगोदर एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामधील आकडे व आजचे आकडे हे समसमान दिसून येत आहे, असे कसे होऊ शकते? असे आश्चर्य व्यक्त करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेबाबत संशयाला जागा मिळत असल्याचे त्या म्हणाल्या, या मतदानमोजणीमध्ये कुठेतरी गोंधळ आणि पाणी मुरत असल्याचे रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.