

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बुधवार (दि.20) रोजी आज बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की. मुक्ताईनगर मध्ये मतदारांमध्ये उत्साह आहे. मतपेटी मध्ये नक्की काय केले आहे, ते मतमोजणीच्या दिवशी लक्षात येऊ शकते. अशा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंदा खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या संपूर्ण परिवारासह आपला मतदानाचा हक्क कोथळी येथे बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी दिसून येत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे. मतपेटी मध्ये नक्की काय झालेले आहेत ते मतमोजणीच्या दिवशी लक्षात येऊ शकते, अशा तुलना त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. हा मतदारांमधील उत्साह परिवर्तनाच्या दिशेने आहे. तसेच राज्यात आघाडी सरकारच्या दृष्टीने वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात आघाडी सरकारचे सरकार स्थापन होऊ शकते. महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशाची वाटप होत आहे, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचेही दिसून येत असल्याचा टोला त्यांनी यावेळी मारला