

ताडकळस : गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार व शिवसेना उद्धव गटाचे विशाल कदम यांच्यात झालेल्या अतिटीच्या लढतीत रासपचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे हे विजय झाल्याची बातमी मिळताच ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार,व गुट्टे मित्रमंडळाचे पुर्णा तालुका युवक अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मारोती मोहिते,व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला.
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल आज दि.२३ नोव्हेंबर शनिवार रोजी लागला आहे. यंदाची निवडणूक गंगाखेड मतदार संघात एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते परंतु खरी लढत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विशाल विजयराव कदम व वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले सीताराम चिमाजी घनदाट (मामा) यांच्यात तिरंगी लढत होईल असे वाटत होते परंतु दोघांमध्ये सरळ व अतिटीची लढत डॉ. रत्नाकर गुट्टे आणि विशाल कदम यांच्यात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
आज सकाळी ८: ०० वाजल्यापासून मतगणनेला सुरुवात झाली पोस्टल मतदानासह पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे विशाल कदम यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली तर निरंतर पंधराव्या फेरीपर्यंत कायम ठेवली परंतु जसं जसं गंगाखेड तालुक्याची मतगणना सुरू झाली तसं तसं रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी आघाडी घेतली आणि शेवटी १४१७५६ मते घेऊन विशाल कदम यांना २७४६१ मतांनी पराभूत केले.
रत्नाकर गुट्टे हे विजय झाल्याची बातमी ताडकळस मिळाल्यानंतर गुट्टे मित्रमंडळाचे पुर्णा तालुका युवक अध्यक्ष मारोती मोहिते, व ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, ग्रामपंचायत सदस्य मणु पाटील आंबोरे,दिलीप आंबोरे, माजी सभापती चंद्रकांत रुद्रवार,रामराव आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य खंडेराव वावरे,गंगाधरराव चिमटे, प्रकाश फुलवरे,यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताडकळस येथील बसस्थानक चौकात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला परंतु या निवडणुकीत आपल्या पुर्णा तालुक्याचा भूमिपुत्र व हक्काचा आमदार व्हावा म्हणून ताडकळस येथील नागरिकांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आपली प्रतितिष्ठा पणाला लावली होती परंतु निराशा हाती लागल्याने ताडकळससह परीसरात शुकशुकाट पसरल्याचे दिसुन आले.