
पुढारी ऑनलाईन डेस्क : उलेमा संघटनेकडून महाविकास आघाडीकडे वफ्फ बोर्डाच्या मागणीसह १७ मागण्या करण्यात आल्या असून या मागण्या देशहिताच्या नाहीत. मात्र महाविकास आघाडी सरकार मतांसाठी त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल तर ते खापवून घेणार नाही. काँग्रेस -ठाकरेंनी उलेमा संघटनेचे पाय चाटू नये, असा घाणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.११) केला. ते ते मुंबईतील वर्सोवा येथील प्रचारसभेत बोलत होते.
असदुद्दीन ओवैसीची काल मुंबईत सभा झाली. औवेसींना मला हेच सांगायचं आहे, हे हैदराबाद नाही तर मुंबई आहे. तुम्ही रझाकारांच सरकार आणण्याचा प्रयत्न करू नका. रझाकारांना आम्ही या महाराष्ट्रात खापवून घेणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. तसेच आम्ही मतांसाठी लाचारी पत्करणार नाही, असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.
औरंगजैबाच्या थडग्यावर जाऊन कोणी फुले वाहून नमस्कार,आदाब करत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांचा विकास करू. पण तुम्ही वफ्फ बोर्डाला हजार कोंटी द्या, त्याठिकाणी असणाऱ्या काझींना पगार द्या, मुस्लिमांना आरक्षण द्या, यासह १७ मागण्या ज्या मागण्या देशहिताच्या नाहीत. त्या मागण्यावर काँग्रेस महाविकास आघाडी अनुमती देत असेल. त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा देव, देश आणि धर्मासाठी मैदानात उतरायचं आहे. आणि आपल्याला कमळाचं बटण दाबून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायंच आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.