गारगोटी : माझं सगळं आयुष्य मतदार संघासाठी समर्पित केले आहे. विविध माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाची घोडदौड सुरू असून पर्यटनद़ृष्ट्या महाराष्ट्रात नव्हे, तर देशातून पर्यटक राधानगरी मतदारसंघ पाहावयास येतील; पण विरोधकांना विकास दिसत नाही, ते दहा वर्षे सत्तेत होते, त्यांनी एक काम केलेले दाखवावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. मुंबई -नायगाव येथील यादव-गवळी समाज सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास ‘बिद्री’चे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी सरकार, दत्ताजीराव उगले, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, बाबा नांदेकर प्रमुख उपस्थित होते.
आ. आबिटकर म्हणाले, माझ्या विजयात तुमची साथ महत्त्वाची आहे. मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यावेळी दीपक पाटील (राशिवडे) , महाराष्ट्र यादव ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवडकीं, गुरुनाथ दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रशांत भावके, जगन देसाई, कांता शेठ, विश्वास देसाई, बापूसाहेब चिले, दीपक वरंडेकर, नामदेव पाटील, मोहन पाटील, उत्तम गोजारे, तुकाराम देसाई, सागर पाटील, रमेश हिरुगडे, राजेंद्र वरंडेकर, विजय गुरव, कृष्णा पाटील आदींसह मुंबईतील चाकरमानी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रदीप वरंडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप धम्मरक्षित यांनी केले. आभार उत्तम गोजारे यांनी मानले.
पुणे, मुंबई येथील चाकरमानी यांच्या सभेतील ईर्ष्या, उत्साह आणि उच्चांकी गर्दी ही आबिटकर यांच्या विजयाची नांदी आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे तुकाराम देसाई (मेघोलीकर) यांनी म्हणताच उपस्थितांनी शिटट्या आणि टाळ्यांच्या गजराने सभागृह दणाणून सोडले.