Candidates of 'Vanchit' Declared: : देवळाली, इगतपुरीत 'वंचित'चे उमेदवार जाहीर

Candidates of 'Vanchit' Declered in Nashik : 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
Maharashtra Assembly elections 2024, Vanchit Bahujan Aaghadi
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.(file photo)
Published on
Updated on

नाशिक : लोकसभेप्रमाणे विधानसभेतही 'एकला चलो'चा नारा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात ३० उमेदवारांचा समावेश असून, जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

Summary

देवळालीतून वंचितचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे, तर इगतपुरीतून भाऊराव डगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी वंचितने पहिली ११, तर दुसरी १० उमेदवारांची यादी जाहीर केली असून, आतापर्यंत वंचितकडून ५१ उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

वंचितने यावेळीही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या यादीत वंचितने विविध जातींच्या उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. रावेर मतदारसंघातून तर शमिभा पाटील या तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. यादीमध्ये उमेदवाराच्या नावासह त्यांच्या जातीचाही प्रामुख्याने उल्लेख केल्याचे दिसून येत आहे. वंचितने आतापर्यंत बौद्ध, राजपूत, कुणबी, माना, आदिवासी, माळी, धनगर, ख्रिश्चन, महादेव कोळी, मुस्लीम, मुस्लीम - पिंजारी, भिल्ल, मराठा आदी जातींच्या उमेदवारांचा यादीत समावेश केला आहे. देवळालीमधून देण्यात आलेलेे उमेदवार शिंदे हे बौद्ध समाजाचे असून, इगतपुरीतून दिलेले उमेदवार डगळे हे महादेव कोळी समाजाचे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news