Maharashtra Assembly Poll: पाच वर्षात भाजपची १ लाख ६६ हजार मते वाढली

आमदार मात्र तेवढेच; माळशिरस हातून गेले, सोलापूर शहर मध्य जिंकले
Maharashtra Assembly Poll
पाच वर्षात भाजपची १ लाख ६६ हजार मते वाढलीpudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भाजपने यंदा सहा जागांवर निवडणूक लढविली. यात पाच जागांवर विजय मिळविला. २०१९ च्या तुलनेत या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची १ लाख ६० हजार ६८ मते वाढली आहेत. यंदा सोलापूर शहर मध्यची जागा लढून ती जिंकली, पण, माळशिरसमध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला.

सन २०१९ मध्ये भाजपने पाचही मतदारसंघात ४ लाख ८३ हजार ११३ मते मिळविली होती. यंदा सहा मतदारसंघात ६ लाख ४३ हजार १८१ मते मिळाली आहे. २०२४ च्या लोकसभेत भाजपला ५ लाख ४९ हजार २८ मते मिळाली होती. लोकसभेच्या तुलनेत ९७ हजार १५३ मते जादा मिळाली आहेत.

२०१९ मध्ये अवकलकोटमध्ये भाजपला १ लाख १९ हजार ४३७ मते मिळाली होती. यंदा विधानसभेला भाजपला १ लाख ४८ हजार १०५ मते मिळाली आहेत. सोलापूर शहर उत्तरमधून २०१९ मध्ये भाजपला ९६ हजार ५२०, तर यंदा १ लाख १७ हजार २९५ मते मिळाली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपला तब्बल एक लाख नऊ हजार १९५ मते मिळाली.

२०१९ च्या विधानसभेला भाजपला ८७ हजार २२३ मते मिळाली होती, गंदा विधानसभेला तब्बल १ लाख १६ हजार ९३२ मते मिळाली. माळशिरसमध्ये सन २०१९ च्या विधानसभेला १ लाख ९३ हजार ५०७ मते मिळवून भाजपने मुसंडी मारली.

पोटनिवडणुकीपेक्षा आवताडेंना जास्त मते

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचे भारत भालके आणि भाजपकडून सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी समाधान आवताडे हे अपक्ष लढले होते. यात भाजपचे परिचारक यांचा पराभव झाला, त्यांना ७६ हजार ४२६ मते मिळाली होती. भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर २०२१ मध्ये पोटनिवडणूक झाली. यावेळी परिचारक आणि आवताडे गट एकत्रित येऊन समाधान आवताडे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. आवताडे यांना एक लाख नऊ हजार ४५० मते मिळाली. यंदा याच मतदारसंघात आवताडे यांना १ लाख २५ हजार १६३ मते म्हणजे पोटनिवडणुकीपेक्षा १५ हजार ७१३ मते अधिक मिळाली.

Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Poll : चार विधानसभा मतदारसंघांत १ हजार ५२३ मतदान केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news