

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज (दि. २०) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी भाजपच्या केंद्रीय मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक यांना तर इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, नालासोपारा येथून राजन नाईक, येरोळीमधून गणेश नाईक, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर, भोसरीतून महेश लांडगे, श्रीगोंदा येथून प्रतिभा पाचपूते, निलंगा येथून सभांजी पाटील निलंगेकर, तुळजापूरमधील राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिखली मतदार संघातून श्वेता महाले, भोकर मतदार संघातून श्रीजा चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंबरी येथून अनुराधाताई चव्हाण, नाशिक पश्चिम येथे सिमाताई हिरे, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूर मतदानसंघातून मंदा म्हात्रे, दहिसर येथे मनिषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकुर, पार्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजले, श्रीगोंडा येधून प्रतिभा पाचपुते, कैजमधून नमिता मंदुडा, या सर्व महिलांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.