
पुढारी ऑनलाईन डेस्कः काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विरोधात भाजपने आज निवडूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत खोटा प्रचार करत आहेत. संविधानाविषयी ते खोटी मते प्रसारित करत आहेत. राज्या- राज्यांमध्ये मतभेद होतील अशी विधाने करत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.
निवडणूक आयुक्तांना आज सत्ताधारी पक्षाचे नेते भेटले. त्यांनी राहुल गांधी हे नियमांचे उल्लंघन करत आहेत, ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचारसभेवेळी गांधी यांनी दोन राज्यांमध्ये मतभेद होतील असे वक्तव्य केले. तसेच भाजप हे संविधान नष्ट करत आहे अशी खोटी माहिती दिली. राहूल गांधी यांना हे वेळोवेळी सूचना देऊनही पुन्हा अशी वक्तव्य करीत आहेत. यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहीती केंद्रीय मंत्री अजून राम मेघवाल यांनी दिली.
पुढे मेघवाल यांनी सांगितले की ६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या सभेवेळी गांधी यांनी ॲपल कंपनीचे आयफोन व बोईंग विमाने इतर राज्यात तयार होतात पण त्याचा खर्च महाराष्ट्रावर टाकला जातो, असा आरोप केला होता. तसेच त्याच रॅलीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसवेक संघावर संविधान नष्ट करत असल्याचा आरोप केला होता. या बाबत आम्ही आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.