पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी किंगमेकर

तीन मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार
 political news
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी किंगमेकरfile photo
Published on
Updated on

पालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचे तिकीट कापून डॉ. हेमंत सावरा यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. त्यामुळे पालघरची राजकीय गणिते बदलली. शिवसेना शिंदे गटाऐवजी भाजपचे प्रात्रल्य या जिल्ह्यावर निर्माण झाल्याने महायुतीला भाजप मोठा भाऊ आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी १, सीपीएम १ असे दोन आमदार आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात अंतर्गत समझोता असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. मात्र तरीही विधानसभेला तिरंगी लढत अटळ आहे. मात्र बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवत नसलेल्या तीन विधानसभा मतदार संघात महायुतीला पाठिंबा देते की महाविकास आघाडीला यावर बरंच चित्र अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्या तरी किंगमेकरच्या भूमिकेत्त बहुजन विकास आघाडीच आहे.

पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे वसई खासदारचे तिकीट कापल्यामुळे पालघर विधानसभेला इच्छुक असलेले आणि भाजपवासी झालेले राजेंद्र गावित यांचा जिल्हा मुख्यालयातील मतदार संघ प्रतिष्ठेच्या उमेदवारांमुळे चर्चेत आला आहे. खरं तर पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे कार्यक्षेत्र डहाणू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना लोकसभेत तिकीट न दिल्यामुळे पालघर विधानसभेत निवडून आणले होते. मात्र शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे बाहेर पडून श्रीनिवास वनगा हे शिंदे गटाबरोबर गेले. मात्र आता वनगा यांना डहाणूमधून उमेदवारी महायुतीची उमेदवारी मिळू शकते. तर पालघरमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित रिंगणात उतरू शकतात. बहुजन विकास अघाडीचा वाल कि ल्ल 1 असलेल्या नालासोपारा बोईसरमध्ये ताकदवान वसई, आणि भाजप उमेदवार देण्याऐवजी बहुजन विकास आघाडीला सहकार्य होईल, असा उमेदवार देण्याची शक्यता आहे.आता निश्चित झालेल्या लढतीमध्ये डहाणू, श्रीनिवास वनगा विरुद्ध विद्यमान आमदार विनोद निकोले यांच्यात लढत होईल. वनगा महायुतीकडून तर निकोले महाविकास आघाडीकडून लढतील.

पालघरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेला पराभूत झालेल्या भारती कामडी या विधानसभा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात माजी खासदार राजेंद्र गावित रिंगणात उतरतील वसईमध्ये हितेंद्र ठाकूर बिरुद्ध विजय पाटील अशी लढत अपेक्षित आहे. तर नालासोपाऱ्यात विद्यमान बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आयात उमेदवार दिला जाऊशकतो. बोईसरमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात डॉ. विश्वास वळवी हे रिंगणात उत्तरतील, तर विक्रमगड विधानसभेला विद्यमान महविकास आघाडीचे आमदार सुनील भुसारा यांच्या विरोधात भाजपकडून नवीन चेहरा दिला जाणार आहे. लोकसभेच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी डहाणू मतदारसंघात पुढे होती. तर विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदारसंघात महायुती पुढे होती. बहुजन विकास आघाडीला एकाही मतदारसंघात मताधिक्य नव्हते. या आकडेवारी नुसार डहाणू मतदारसंघात महाविकास आघाडीचे विनोद निकोले हे सुरक्षित मानले जात आहेत.

तर विक्रमगड मध्ये भारती कामडी, यांना ७२८४४ मते मिळाल्याने आणि महायुतीला जवळपास ३०००० चे मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदा सुनील भुसारा यांना अधिक कार्यक्षमतेने निवडणूक लढवावी लागणार आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीला ३० हजार मताधिक्य होते. या मतदारसंघात भारती कामडी यांना ६४ हजार ३५२ मते होती. ती विधानसभेला रिंगणात उतरल्यास त्यांना बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळवावा लागेल, तरच महायुतीसमोर त्यांचा निभाव लागू शकेल. बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडी पाठिंबा देणार की महायुती यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. कारण बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीबरोबर आल्यास विधानसभेचे विजयाचे गणित महाविकास आघाडीसोबत येईल. पण तेच चित्र उलटे झाले आणि बहुजन विकास आघाडी आणि महायुती एकत्र आली तर महाविकास आघाडीची गणिते ही या जिल्ह्यात बिघडू शकतात.

भाजप गतवैभव मिळवणार का?

सध्या बहुजन विकास आघाडी दोन्ही पर्यायांवर विचार करत आहे. पण, त्यांचे झुकते माप हे महायुतीसोबत जाणारे असल्याने या भागात भाजप आपले वर्चस्व राखू शकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभेची आपल्या पक्षाची गेलेली जागा भाजपने परत मिळवली आहे. आता विधानसभेच्या गमावलेल्या दोन जागा भाजप मिळवणार का, याकडे लक्ष आहे. भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर पालघरची धुरा सोपवली आहे. ते अडीच वर्षे या जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेचे दादा भुसे है पालघरचे पालकमंत्री होते. परंतु त्यांनीच पक्षांतर केल्यामुळे शिवसेनेला लोकसभेत फटका बसला. यातून सावरणारी ठाकरेंची शिवसेना विधानसभेला कसा परफॉर्मन्स करणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news