छत्रपती संभाजीनगर : अतिशय प्रतिष्ठेची लढत मान्यल्या जाणाऱ्या औरंगाबाद पूर्व मतदार संघातून भाजपचे अतुल सावे यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा 2161 मतांनी पराभव करत विजय मिळवला.
दरम्यान विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील यांची आघाडी कायम होती. मात्र २१ व्या फेरीनंतर जलील यांची पीछेहाट सुरू झाली. त्यानंतर २२ व २३ व्या फेरीत रंगतदार लढत बघायला मिळाली. मात्र अखेर अतुल सावे यांनी 2161 मतांनी विजय मिळवला. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्याकडून 'सबको भावे अतुल सावे, हॅट्रिक, हॅट्रिक जो हिंदू हित की बात करेगा वही देश मे राज करेगा', अशा घोषणा देण्यात आल्या.